बघतोस काय मुजरा करच्या स्क्रिनिंगला अवतरले कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:51 IST
सध्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. आजच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची ...
बघतोस काय मुजरा करच्या स्क्रिनिंगला अवतरले कलाकार
सध्या बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. आजच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती उतरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाच खास स्क्रिनिंग सोहळा पार पडला. या शोला कलाकारांनी मोठया प्रमाणात उपस्थिती लावले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला प्रेक्षकांच्या लाडके कलाकारदेखील पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाले. आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, सायली संजीव, सचिन खेडेकर, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या चित्रपटातील हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग हे कलाकारदेखील यावेळी होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले आहे. या चित्रपटात गड, किल्ले यांचे कसे संवर्धन करायचे यासंबंधीचा जनजागृती करण्याचा संदेश प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे. ज्या नजरेतुन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य पाहिलं ती नजर परत आणुया... आपल्या महाराष्ट्राचं वैभव परत आणुया! हा संदेश देणारा हा चित्रपट नक्कीच बॉक्सआॅफीसवर कमाल करणारा ठरणार आहे. तसेच सध्या महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे असा मेसेज या चित्रपटातून देण्यात येणार आहे. तीन शीव भक्त एका बाजूला आहेत तर राजकारणी मंडळी एका बाजूला यांच्यातला लढा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. याचित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंतने ढोमेचे आहे. तसेच या चित्रपटाचे काही शूटदेखील लंडनमध्येही झाले आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील सरप्राईज देणार आहे.