अॅवॉर्ड्समध्ये कलाकारांची धुम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:41 IST
अॅवॉर्ड फन्क्शन कोणतेही असो कलाकार त्यासाठी फारच उत्सुक असतात. कोणते कपडे घालायचे, कोणती फॅशन करायची ...
अॅवॉर्ड्समध्ये कलाकारांची धुम
अॅवॉर्ड फन्क्शन कोणतेही असो कलाकार त्यासाठी फारच उत्सुक असतात. कोणते कपडे घालायचे, कोणती फॅशन करायची आपला लुक सगळ््यांपेक्षा डिफरंट असला पाहिजे अशी कॉम्पिटीशन या सेलिब्रिटीजमध्ये अॅवॉर्ड सेरेमनिच्या वेळी पहायला मिळते. आताच्या सर्वच अॅवॉर्ड फन्क्शन्सना ग्लॅमरस स्वरुप आले आसल्याचेच दिसुन येते. मराठी इंडस्ट्रीचे पुरस्कार सोहळे देखील साता समुद्रापार परदेशात होतात, तर काही सोहळे क्रुझ वर होतात. चंदेरी दुनियेतील या ग्लॅमरस सोहळ््यांमध्ये स्टार्ससुद्धा मनसोक्त एन्जॉय करतात. नूकत्याच पार पडलेल्या मिक्टाच्या सोहळ््याला मराठीतील जवळपास सर्वच कलाकारांनी उपस्थिती दर्शवून चार चांद लावले. यावेळी सर्व फे्रन्ड्स सेलिब्रिटीजनी एकत्र येऊन फोटो काढले. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, उर्मिला कोठारे, आदिनाथ कोठारे, अनिकेत विश्वासराव, आनंग इंगळे याकलाकारांनी मिक्टामध्ये धुम केली.