कलाकारांनी केली तळजाई टेकडी हिरवी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 12:23 IST
जागतिक पर्यावरण दिना निमित्त, पुण्यातील तळजाई टेकडी मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन 'वृक्षारोपण करून' पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत ...
कलाकारांनी केली तळजाई टेकडी हिरवी !
जागतिक पर्यावरण दिना निमित्त, पुण्यातील तळजाई टेकडी मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन 'वृक्षारोपण करून' पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली आहे. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार आणि लेखक किरण यज्ञोपवीत, कवी-अभिनेता संदीप खरे, कवी वैभव जोशी शिवाय प्रवीण तरडे, विनोद खेडकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता माळी, अश्विनी एकबोटे, देवेंद्र गायकवाड, रोहन मंकणी, शिवराज वाळवेकर,श्रीराम पेंडसे, आशितोष वाडेकर, चेतन चावडा, संगीतकार विश्वजीत जोशी,दिग्दर्शक डॉ अंबरीश दरक, नितीन चव्हाण, अजय नाईक, बंटी-प्रशांत, अॅड. रमेश परदेशी या कलाकारांनी वड, कडूनिंब, पिंपळ यांंसारखे मोठे वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार केली आहे. हा उपक्रम चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेता योगेश सुपेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य बाबा पाटील, डॉ. शंतनू जगदाळे आणि माध्यम तज्ञ विनोद सातव यांनी आयोजित केला होता.तसेच यावेळी माननीय महापौर प्रशांत जगताप, उप महापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक सुभाष जगताप हे देखील उपस्थित होते.