आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पुणेरी कलाकार मंडळी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर उतरुन बाजी मारायला सज्ज होणार आहेत. कलाकारांच्या टीमचा क्रिकेटचा सामना ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ मध्ये पुणे येथे होणार आहे. कलाकारांचा क्रिकेट सामना हा प्रथमच पुण्यात होत आहे.
४,५ आणि ६ जुलै रोजी ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग’ हा क्रिकेटचा सामना हिंजेवाडी येथील हाय मॉंट येथे सायंकाळी ५ ते रात्री ११ च्या दरम्यान होणार आहे.
या क्रिकेट लीग मध्ये मधुरा देशपांडे, तेजस्विनी लोणारी, आरोह वेलणकर, सुयश टिळक, सौरभ गोखले, प्रथमेश परब, आस्ताद काळे, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, आर्या आंबेकर, प्राजक्ता माळी, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, अक्षय वाघमारे, उपेंद्र लिमये यांसारखे इतर उत्साही पुणेरी कलाकारांचा सहभाग आहे.
क्रिडा क्षेत्राविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे.