आर्या झाली रिफ्रेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 12:46 IST
आजच्या धावपळीच्या काळात माणसे ही खूप बिझी असल्याचे दिसतेय. लोकांना स्वत:साठी देखील वेळ नसतो. रोजच्या धावत्या युगात कुठेतरी माणसाला ...
आर्या झाली रिफ्रेश
आजच्या धावपळीच्या काळात माणसे ही खूप बिझी असल्याचे दिसतेय. लोकांना स्वत:साठी देखील वेळ नसतो. रोजच्या धावत्या युगात कुठेतरी माणसाला निवांतपणा मिळावा यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. काहीजण आपल्याला हा निवांतपणा मिळावा यासाठी छोटीशी ट्रीप घडवून आणतात. अशीच एक ट्रीप गायिका आर्या आंबेकर हिने अलिबाग येथे घडवून आणली. या ट्रीपचे काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या ट्रीपने मी पुन्हा रिफ्रेश झाले असल्याचे देखील तिने सोशल मीडियावर सांगितले. कदाचित आर्याने काही दिवसांपूर्वीच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात झळकणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. या चित्रपटाच्या बिझी शेडयूल नंतर तिला निवांतपणा मिळावा यासाठी तिने अलिबागच्या समुद्रकिनारी मस्त धमाल केलेली तिच्या या फोटोतून दिसत आहे. त्याचबरोबर तिचा हा हटके लूकदेखील तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक हिंदी अल्बमदेखील प्रदर्शित झाला होता. तिच्या मराठी अल्बमनेदेखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आर्याने मराठी रियालिटी शोपासून करिअरची सुरूवात केली होती. आता ती, गायिकेनंतर अभिनेत्री बनणार असल्याने तिचे चाहतेदेखील भलतेच खूश आहेत. ती सध्या काय करते हा तिचा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनय बेर्डे पाहायला मिळणार आहे. तसेच अंकुश चौधरी व तेजश्री प्रधान या तगडया कलाकारांचा देखील या चित्रपटात समावेश असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता साहजिकच प्रेक्षकांना लागली आहे.