Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आर्चीच्या घरी पुन्हा ‘सेलिब्रेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 18:05 IST

सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एका रात्रीत स्टार झाली. तिला पहिल्याच चित्रपटातून मोठे यश मिळाले असून तिच्या सर्व ...

सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एका रात्रीत स्टार झाली. तिला पहिल्याच चित्रपटातून मोठे यश मिळाले असून तिच्या सर्व चाहत्यांनी तिला डोक्यावर धरलय. विशेष म्हणजे सैराट चित्रपटातील तिच्या अभिनयाला ६३ वा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. या रिंकू राजगुरुचा उद्या म्हणजेच तीन जून रोजी बर्थडे आहे.रिंकू दहावीच्या वर्गात गेली असून ती जिजामाता प्रशाला शाळेत शिकतेय. २०१३ मध्ये रिंकू नागराज मंजुळेंना पहिल्यांदा भेटली होती. त्यानंतर बरोबर वर्षभरानंतर सैराट सिनेमासाठी तिची निवड झाल्याचे तिला सांगण्यात आले. रिंकूच्या सैराट चित्रपटातील अभिनयाचे कौतुक मराठी चित्रपटसृष्टीतूनच नव्हे तर बॉलीवूड मधूनदेखील होत आहे.