उडती खबर
लगोरी हा खेळ सध्या नामशेष होताना दिसतो आहे.या खेळाचं अस्तित्व टिकवण्यासाठी महालगोरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सैराट चित्रपटातून यशाच्या शिखरावर पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु लगोरी खेळणार असल्याचे कळते आहे. या स्पर्धेत रिंकूबरोबरच इतर मराठी कलाकारदेखील सहभागी होणार असल्याचे समजते आहे. तसेच या स्पर्धेतून जमा झालेला निधी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.