Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्ची झळकणार आता, जाहिरातीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 13:28 IST

संपूर्ण महाराष्ट्राला येडं लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने आता जाहिरात क्षेत्राला देखील येड लावलं आहे. रिंकूचे सैराटपण पाहता, ...

संपूर्ण महाराष्ट्राला येडं लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने आता जाहिरात क्षेत्राला देखील येड लावलं आहे. रिंकूचे सैराटपण पाहता, जाहिरात क्षेत्राला देखील तिला निवडण्याचा मोह आवरला नाही. एका रात्रीत स्टार बनलेली आर्चीची लोकिप्रयता पाहता, तिला जाहिरात कंपन्यांकडूनही प्रॉडक्ट लाँचिगसाठी देखील आॅफर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच 'गो' या एडिबल आॅईलचे प्रॉडक्ट लाँचिंग रिंकूच्या हस्ते पार पडलं. अशा प्रकारे मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला सैराट कमाईच्या रेसमध्ये सुस्साट आहे. आतापर्यंत या सिनेमाने ८० कोटीहून अधिक कमाई केली आहे. तसेच मराठीच नव्हे तर बॉलीवूडमध्येही या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे.  अनेक बॉलीवूड कलाकारांनी सैराटचे तोंडभरुन कौतुकही केले. सैराटची टीम लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही दिसणार आहे.