Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्चीचा दाक्षिणात्य 'सैराट' ९ फ्रेबुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 10:57 IST

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ९ महिने झाले असले ...

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ९ महिने झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ अजून ही प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटाच्याविषयी, कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. हा चित्रपट जितका हीट ठरला तितकीच सुपरहीटदेखील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूदेखील झाली आहे. आर्चीविषयी तर चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. आर्चीला पाहण्यासाठी तिचे चाहते तिच्या घरापर्यत पोहोचलेलेदेखील पाहायला मिळाले. आता, प्रेक्षकांच्या याच लाडक्या अभिनेत्रीचा दाक्षिणात्य सैराट हा चित्रपट ९ फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. तिच्या या दाक्षिणात्य चित्रपटाचे नाव मनसु मल्लिगे असे आहे.                   आर्चीचा हा दाक्षिणात्य चित्रपटदेखील मराठी चित्रपटाप्रमाणेच हीट होणार असा अंदाज लावता येत आहे. कारण दाक्षिणात्य भागात सैराट आणि या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. म्हणूनच थेट या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर सैराट चित्रपटाच्या गाण्यावर थिरकणाºया दाक्षिणात्य कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये दाक्षिणात्य तरुणांनी अनोख्या अंदाजात सैराट चित्रपटातील याड लागलं हे गाणे सादर केल्याचे पाहायला मिळाले. हिंग्लिश माशप या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.                   चला तर पाहूयात या दाक्षिणात्य चित्रपटातदेखील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू दाक्षिणात्य प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या प्रेमात पाडते का? तसेच या तिचा हा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना आर्चीचा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे.