आणखी एक घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 12:31 IST
२०१६ या वर्षाची सुरुवात झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीच्या घटस्फोटाची बातमी ऐकायलाच मिळत आहे. आता या सेलिब्रेटींमध्ये आणखी एक ...
आणखी एक घटस्फोट
२०१६ या वर्षाची सुरुवात झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीच्या घटस्फोटाची बातमी ऐकायलाच मिळत आहे. आता या सेलिब्रेटींमध्ये आणखी एक भर पडली आहे. अभिनेत्री मानसी साळवी आणि तिचे पती दिग्दर्शक हेमंत प्रभू घटस्फोट घेणार आहेत. या दोघांच्या लग्नाला ११ वर्षं झाले असून त्यांना आठ वर्षांची मुलगीही आहे. मानसी आणि हेमंत गेले एक वर्षं वेगळे राहात असून त्यांनी आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांची मुलगी सध्या मानसीसोबत राहात असून त्या दोघांनी संगनमताने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. घटस्फोटाचे कारण अद्याप तरी कळलेले नाही. पण घटस्फोटानंतरही हेमंत आणि मानसी एकमेकांच्या संपर्कात असून मला जेव्हाही आयुष्यात हेमंतच्या मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तो माझ्यासोबत असेन असे मानसी सांगते.