Join us  

अंकुश चौधरीची पत्नी दीपाकडे असा गुण आहे जो जगातील ९९ टक्के लोकांकडे नाही, अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 6:46 PM

Deepa Chaudhari : अंकुश चौधरीची पत्नी दीपा सध्या तू चाल पुढं मालिकेत काम करताना दिसत आहे. याशिवाय ती नुकतीच बाईपण भारी देवा या चित्रपटात झळकली आहे.

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित बाईपण भारी देवा (Baipan Bhari Deva) हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले आहेत. मात्र अजूनही प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच या चित्रपटाची ग्रॅण्ड सक्सेस पार्टी पार पडली. यावेळी केदार शिंदे, बेला शिंदे, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर, शरद पोंक्षे, सतीश जोशी यांनी हजेरी लावली. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा नवलकरने दीपा परब बद्दल एक मोठे विधान केले. ती म्हणाली की, दीपा चौधरीकडे असा एक गुण आहे जो ९९ टक्के लोकांमध्ये नाहीये.

शिल्पा नवलकरने सांगितले की, दीपा, वंदू ताई आणि रोहिणी मावशी या नक्कीच माझ्या नवीन मैत्रिणी आहेत. दीपामध्ये असलेला एक गुण असा आहे जो जगातल्या ९९ टक्के लोकांमध्ये नसतो. असा एक खूप खास गुण आहे दीपामध्ये. ती चांगली लिसनर आहे. ९९ टक्के लोक ऐकत नाहीत समोरच्याच वाक्यमध्ये तोडून ते बोलायला लागतात. त्याला जे काही बोलायचं असेल ते ऐकून न घेता आपलं बोलायला लागतात.

शिल्पा नवलकरने दीपाचे तोंडभरून केलं कौतुकती पुढे म्हणाली की, दीपामध्ये हा गुण आहे की ती कधीच समोरच्याच बोलणं तोडत नाही ती शांतपणे सगळं ऐकून घेते, समजून घेते आणि तितक्याच शांतपणे तिचं म्हणणं मांडते. हा तिच्यातला एक गुण मला फार आवडला, तिचा साधेपणा, ती सॉफ्ट आहे हे सगळं मला खूप आवडलं. अशा शब्दांत शिल्पा नवलकरने दीपाचे तोंडभरून कौतुक केले. 

टॅग्स :अंकुश चौधरी