Join us
Daily Top 2Weekly Top 5

'थलायवा'सह या अंजली पाटीलचा सेल्फी ठरतोय सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 14:12 IST

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलावंतानाच मिळते. अशीच संधी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली आहे. या ...

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलावंतानाच मिळते. अशीच संधी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अंजली पाटील. मूळची नाशिकची असलेली अंजली लवकरच रजनीकांत यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रजनीकांत यांच्या आगामी 'काला कारिकालन' या सिनेमात अंजली झळकणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. नुकतंच अंजलीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. थलायवा रजनीकांत यांच्यासोबतचा तिचा हा सेल्फी रसिकांना चांगलाच भावतो आहे. या फोटोसह तिनं एक पोस्टही शेअर केली आहे. 'आयुष्यात एकाच वेळी साधं, सुंदर आणि प्रशंसनीय कसं जगावं? तर याचं उत्तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रजनीकांत' अशी पोस्ट तिनं या फोटोसह शेअर केली आहे. अंजलीचा हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरतो आहे. रसिकांचे लाइक्स आणि कमेंटमुळे सोशल मीडियावर हा फोटो सध्या गाजतो आहे.'काला कारिकालन' हा आगामी तमिळ सिनेमा असून रजनीकांत यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर कबाली फेम प.रणजिथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाबाबत अंजली भलतीच एक्साईटेड आहे.अंजली पाटील पहिल्यांदाच दक्षिणेच्या सिनेमात काम करते असं नाही. याआधीही तिने दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. 'दिल्ली इन ए डे', 'चक्रव्यूह' या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालं. तसंच श्रीलंकन सिनेमा 'विथ यू विदाऊट यू' या सिनेमासाठी तिला गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सिल्वहर पीकॉक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.याशिवाय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही अंजलीला गौरवण्यात आलं आहे. तेलुगू सिनेमा 'ना बांगारु टल्ली' सिनेमातील भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन पुरस्काराने तिला गौरवण्यात आले होते.