Join us  

अंजानः स्पेशल क्राईम्स युनिटच्या चित्रीकरणाच्या वेळेस गश्मीर महाजनीला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 7:09 AM

कलाकारांना ब-याचदा शूटिंगवेळी स्टंट करताना इजा होते. अशावेळी जास्त दुखापत झालेली असतानाही त्यांना शूटिंग पूर्ण करावे लागते.असेच काही अभिनेता ...

कलाकारांना ब-याचदा शूटिंगवेळी स्टंट करताना इजा होते. अशावेळी जास्त दुखापत झालेली असतानाही त्यांना शूटिंग पूर्ण करावे लागते.असेच काही अभिनेता गश्मीर महाजनीसोबत घडले.क्लायमॅक्सचे दृश्य चित्रीत करताना सेटवरील एका अपघातामुळे त्याला इजा झाली.डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील पॅरानॉर्मल थरारक शो अंजानःस्पेशल क्राईम्स युनिटमध्ये इन्स्पेक्टर विक्रांतची भूमिका गश्मीर महाजनी साकारत आहे.या शोच्या शूटिंगमध्ये गश्मीर गंभीर दुखापत झाली.मुळात तो सगळे स्टंट करणे स्वतःच करतो त्यामुळे स्टंट करतेवेळी तो जखमी झाला असल्याचे कळतेय.मात्र इतकी दुखापत होवूनही त्या गोष्टीचा बाऊ न करता 'शो मस्ट गो ऑन' म्हणत गश्मीरने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.योग्य मार्गदर्शनाखाली गश्मीर एक दृश्य चित्रीत करत होता ज्यात त्याला आपल्या हाताने काचेची खिडकी फोडायची होती.दुर्दैवाने, काच फोडण्यासाठी त्याच्या हातात जे डिव्हाईस दिले होते ते आयत्या वेळेस चाललेच नाही आणि ग्लास कटिंगमुळे त्याच्या हाताला अगदी हाडापर्यंत दुखापत झाली.प्रॉडक्शन हाऊसने लगेचच डॉक्टरांना सेटवर त्याच्या उपचारांसाठी बोलावले होते.याबद्दल गाश्मीर म्हणाला, “होय, हे खरं आहे की मला एका अॅक्शन दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस जखम झाली. पण अख्ख्या क्रू ने माझी खूप काळजी घेतली आणि माझ्यासाठी लगेच वैद्यकिय मदत उपलब्ध केली. क्रू ने मला काही दिवस आरामही करण्याचा सल्ला दिला पण मीच चित्रीकरण सुरू ठेवण्यावर भर दिला कारण दि शो मस्ट गो ऑन.”लोटस टॉकीज निर्मित हा शो सुपरनॅचरलसोबत जोडलेल्या गुन्ह्यांच्या मामल्यांची उकल करतात आणि जे कोणाला दिसत नाही, ऐकू येत नाही आणि सर्वांचा ज्यांच्यावर विश्वास बसत नाही अशांना न्याय मिळवून दिला जातो.आजवर अनेक सिनेमा त्यातील बोल्ड कंटेंट किंवा मग कुणाच्या भावना दुखावणारा विषय यामुळे सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोव-यात अडकतो. त्यामुळे निश्चित झालेल्या तारखेला सिनेमा रिलीज होण्यास अडथळाही होतो.परिणामी कधी सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात येते किंवा मग काही तोडगा काढल्यानंतर सिनेमा प्रदर्शित होतो.आता मराठीतही असाच एक सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला होता.चक्क सिनेमाच्या नावामुळे त्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच ठरलेली नसल्याचे समजतंय. मृण्मयी देशपांडे आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा 'रुबिक्स क्युब' या शीर्षकामुळे वादाच्या भोव-यात अडकला आहे.परिणामी या सिनेमा रिलीज होण्यापासून रखडलाय.एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार सिनेमाच्या नावात बदल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.त्यामुळे या  सिनेमावर थेट कोर्टाने स्थगिती आणली आहे.सिनेमाच्या नावात बदल झाल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.