Join us

​अनिकेत विश्वासरावचा हा! मी मराठा हा चित्रपट २ मार्चला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 15:09 IST

अनिकेत विश्वासराव नुकताच पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल, बघतोस का मुजरा कर यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता. अनिकेतचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी ...

अनिकेत विश्वासराव नुकताच पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल, बघतोस का मुजरा कर यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता. अनिकेतचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. आता अनिकेतचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याच्यासोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.प्रविण कारळे दिग्दर्शित हा! मी मराठा !!! सिनेमा येत्या २ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. या चित्रपटात अनिकेत विश्वासरावसोबतच प्रियांका यादव, भूषण कडू, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, विशाल ठक्कर, यतीन कार्येकर, आशिष पवार, सविता प्रवीण आणि मेघा घाडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे निर्माते अमृता राव, आकाश राव आणि सह निर्माते मोहन सचदेव आहेत. हा! मी मराठा!! हा चित्रपट कोणत्याही जाती वा समाजाचा पुरस्कर्ता नाहीये असे चित्रपटाच्या टीमने स्पष्ट केले आहे. या चित्रपटात एका मराठी माणसाच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. हा सिनेमा एक अॅक्शनपट आहे.कॉलेज जगतातील अनेक आठवणी आपल्या मनात आयुष्यभर घर करून असतात. कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. मग त्या मित्रांच्या गोष्टी असोत किंवा शिक्षकांच्या असोत. कितीही वर्षांनी आपल्याला त्या नक्कीच आठवतात. अशीच काहीशी कॉलेजची गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मिलिंद नारायण, गुरू शर्मा यांनी सिनेमाला संगीत दिले असून गाण्यांना वैशाली सामंत, कैलाश खेर, शान, सुनिधी चौहान या गायकांचा आवाज लाभला आहे. कथा निहारिका यांची असून पटकथा आणि सवांद प्रदीप राणे यांचे आहे. सिनेमाची गोष्ट शिवा पाटीलच्या भोवती गुंफण्यात आली आहे. साधा, भोळा असला तरी हा शिवा हुशार आहे. त्याच्या आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो मुंबईतल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि तिथूनच या सिनेमाची सुरुवात होते. कॉलेजमधील गंमतीजंमती सोबत अनेक गोष्टी या सिनेमात बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून शिवाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. शिवा अन्यायाविरुद्ध लढा द्यायला तयार होतो आणि पुढे काय होते त्यासाठी सिनेमा बघावा लागणार आहे.Also Read : ​...आणि अनिकेत विश्वासरावला पाण्यात ढकलून पूजा सावंतने काढला पळ