Join us

नात्यांतील बदलत्या स्वरुपांना जोडणारा '& जरा हटके'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 12:30 IST

 नात्यांचे बदलत जाणारे स्वरूप, या बदलत जाणाºया  नात्यांमध्ये साहजिकच वाढलेला दुरावा अशी आजच्या मॉर्डन युगातली नात्यांची समीकरणआहेत.  या कालानुरूप ...

 नात्यांचे बदलत जाणारे स्वरूप, या बदलत जाणाºया  नात्यांमध्ये साहजिकच वाढलेला दुरावा अशी आजच्या मॉर्डन युगातली नात्यांची समीकरणआहेत.  या कालानुरूप बदलत गेलेल्या नात्यांमधली भावनिक गुंतागुंतआपल्याला आगामी & जरा हटके या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली निर्मितीसंस्था इरॉस इंटरनॅशनल तसेचमराठी चित्रपटसृष्टीला सुपरहिट सिनेमे देणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधवया दोघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.            '&' हे मुळाक्षर दोन वेगवेगळ्या शब्दांना एकत्र करणारे असल्यामुळे या चित्रपटात हटके लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा फिरतेय. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांचीमुलं कसे स्वीकारतात, यावर हा चित्रपट अधोरेखित करण्यात आला आहे.  त्यांच्यातील वाद, हेवेदावे आणि याबरोबरच ओघाने येणाºया जनरेशन गँपचासमतोल  '& जरा हटके' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.       मिताली जोशी यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून प्रकाश कुंटे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'कॉफी आणि बरच काही' या सिनेमातून आपलेदिग्दर्शकीय पदार्पण करणारे प्रकाश कुंटे यांनी या सिनेमात एक कुटुंबाचीहृदयस्पर्शी कथा मांडली आहे.  या सिनेमातील 'सांग ना' हे रोमँटिक जॉनरचेगाणे मंगेश कांगणे  लिहिले आहे तर शैल हाडा आणि हमसीका अय्यर याजोडगोळीने गायलेले हे गाणे मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनीलसेनगुप्तां यांच्यावर चित्रित आले आहे. याच चित्रपटातील उमलून आले हेनात्यांमधील टप्पे दाखवणार हे गाणं संदीप खरे यांनी लिहिले असून शाशातिरुपती यांनी हे गाणं स्वरबद्ध केले आहे. मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता,सिद्धार्थ आणि शिवानी या चौघांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. आदित्य बेडेकर हे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आहेत. वासुदेव राणे हे यासिनेमाचे सिनेमॅटोग्राफर असून मयूर हरदास यांनी या सिनेमाचे संकलन केलेआहे.             आधुनिकीकरणाच्या या युगात वेगाने बदलत असलेली नात्यांची संकल्पनाआणि त्यामुळे उद्भवणाºया समस्या प्रत्येकांच्या घराघरात पाहायला मिळतात. अशावेळी नात्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी '&' हा महत्वाचाअसतो, मात्र या चित्रपटातला '&' इतरांहून जरा हटकेच असल्यामुळे '& जरा हटके' हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे.  बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनील सोबतच मृणालकुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे, स्पृहा जोशी, सुहास जोशी, सोनालीआनंद, संदेश कुलकर्णी हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणारआहेत.  नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.