Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...आणि प्रार्थनेच्या आध्यात्मिक शक्तीवर भर देतो", उर्मिला कोठारेची संकष्टी चतुर्थीनिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:10 IST

Urmila Kothare : उर्मिला कोठारे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान आज संकष्टी चतुर्थी निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत तिने साकारलेली वैद्येहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकतीच मालिकेनं निरोप घेतला आहे. मात्र उर्मिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान आज संकष्टी चतुर्थी निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

उर्मिला कोठारेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी भक्त उपवास धरतात आणि विघ्नहर्त्या गणेशाची प्रार्थना करतात, त्याच्या कृपेने ज्ञान, संपत्ती आणि समस्यांचे निराकरण होण्यासाठी, हा पवित्र दिवस भक्ती, आत्मानुशासन आणि प्रार्थनेच्या आध्यात्मिक शक्तीवर भर देतो.

उर्मिला ही महेश कोठारेंची सून आहे. महेश कोठारेंचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारेबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना जिझा ही मुलगी आहे. अनेकदा उर्मिला लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या पोस्टला चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारे