Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मलंग"मधील भूमिकेसाठी अमृता खानविलकरने घेतली इतकी मेहनत, चक्क १२ किलो वजन केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:30 IST

"मलंग" हा नव्या वर्षातला बहुचर्चित सिनेमा असून अमृतासाठीही हा सिनेमा महत्त्वाचा आहे. तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली.अमृता खानविलकर आता "मलंग" या बहुचर्चित सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

मोहित सुरी दिग्दर्शित "मलंग" या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा अभिनेता अनिल कपूरच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिल कपूर आणि  कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलर मध्ये आहे. "मलंग" हा नव्या वर्षातला बहुचर्चित सिनेमा असून अमृतासाठीही हा सिनेमा महत्त्वाचा आहे. तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. 

७ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल १२ किलो वजन कमी केलं आहे. सिनेमाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. आता या सिनेमात अमृताच्या वाट्याला काय भूमिका आली आहे, हे लवकरच कळेल.अमृता तिच्या नेहमीच्या शैलीत या सिनेमात नक्कीच भाव खाऊन जाईल यात शंका नाही.

टॅग्स :अमृता खानविलकर