Join us

अमृता खानविलकरने नवऱ्याला हटके अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 15:24 IST

अमृता खानविलकरने हिमांशूचा एक क्यूट फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देअमृता खानविलकरने हिमांशूचा एक क्यूट फोटो शेअर केला असून त्यासोबतच लिहिले आहे की, १६ वर्षांची मजा-मस्ती, चढ-उतार आणि अजून खूप काही... आणि आता तर आपल्या लग्नाला पाच वर्षं झाली.

मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि चार्मिंग हिंदी अभिनेता हिमांशू मल्होत्रा या सुपरहिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'नच बलिये' गाजवणाऱ्या या जोडीचा आज लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे. अमृताने एका हटके अंदाजात हिमांशूला इन्स्टाग्रामद्वारे लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमृता खानविलकरने हिमांशूचा एक क्यूट फोटो शेअर केला असून त्यासोबतच लिहिले आहे की, १६ वर्षांची मजा-मस्ती, चढ-उतार आणि अजून खूप काही... आणि आता तर आपल्या लग्नाला पाच वर्षं झाली. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... मला एक अधिक चांगली व्यक्ती बनायला तू शिकवलेस यासाठी तुझे खूप आभार... मला दिशा देणारा... मला सांभाळून घेणारा तू आहेस... माझ्या आयुष्यात तुझी जागा खूपच खास आहे. 

'मेड फॉर इच अदर' कपल अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा २४ जानेवारी २०१५ ला रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. नववधुच्या वेषात सजलेली अमृता लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. 

अमृता आणि हिमांशूची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. ओळख झाल्यापासूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास १० वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती. १० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो तर अमृता आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.

टॅग्स :अमृता खानविलकर