अमृताचे पहिले पुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 03:58 IST
किल्ला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळालेली अभिनेत्री अमृता सुभाष ही बनली आहे लेखिका. कारण तिचे लिखाण आपण ...
अमृताचे पहिले पुस्तक
किल्ला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळालेली अभिनेत्री अमृता सुभाष ही बनली आहे लेखिका. कारण तिचे लिखाण आपण सातत्याने वाचत असलो तरी, एक उलट...एक सुलट हे तिचे पहिले पुस्तक आहे.अमृताने अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटकात अभिनय केला आहे. तसेच तिचे फुलराणी हे मराठी नाटकाची खूप प्रशंसा देखील झाली होती. अभिनयासोबत तिने लेखिका बनण्याचे स्वप्नदेखील यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या पुस्तकासाठी तिला राज्यस्तरीय पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. अभिनयाप्रमाणेच तिचे विचार देखील अधिक वाचायला मिळो अशी अपेक्षा करण्यास काय हरकत.