Join us

मॅडम तुसादमध्ये अमृता खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 14:53 IST

अमृता खानविलकरच्या मॅड टू या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेचे चित्रीकरण नुकतेच संपले आहे. या कार्यक्रमात ती परीक्षकाची भूमिका साकारत होती. ...

अमृता खानविलकरच्या मॅड टू या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेचे चित्रीकरण नुकतेच संपले आहे. या कार्यक्रमात ती परीक्षकाची भूमिका साकारत होती. या कार्यक्रमाद्वारे ती एक चांगली परीक्षक असल्याचेदेखील तिने सिद्ध केले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ती या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर अमृताने आता काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे.एप्रिल, मे महिना म्हटला की प्रत्येकाला कुठे ना कुठे फिरायला जायचे वेध लागतात. अनेकजण एप्रिल, मेच्या सुट्टीत कुठे जायचे याचे प्लानिंग कित्येक दिवस आधीपासूनच करतात तर काहीजण अचानकपणे बेत आखून फिरायला जातात. सुट्टीचा मोसम असताना मराठी इंडस्ट्रीतील कलाकारदेखील आता कसे मागे राहातील? वाजले की बारा फेम अमृता खानविलकर सध्या हॉगकाँगला फिरायला गेली आहे. तिथे सोबत तिची आईदेखील आहे. हॉगकाँगमध्ये असताना तिने तिथल्या प्रसिद्ध मॅडम तुसाद म्युझियमला भेट दिली आहे आणि तिथले फोटोदेखील तिने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहेत. आर्यन मॅन, हॅलो किटी आणि मायकल जॅक्सन यांच्या पुतळ्यांसोबत अमृताने मस्त फोटोसेशन केले असून हे फोटो खूपच छान आले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या फोटोंना अनेकांनी लाइक केले असून अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट केले आहे.  हॉगकाँगमध्ये गेल्यावर अमृता एखाद्या लहान मुलासारखी आनंदित झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅडम तुसादसोबतच तिने हॉगकाँगमधल्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. अमृताचे हे फोटो पाहिल्यावर ती हॉगकाँगच्या प्रेमात पडली आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.