ही गोष्ट करणं अमृता खानविलकरला चागलंच पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 09:49 IST
धर्मा प्रोडक्शन्सच्या 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या‘डॅमेज’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दूनियेत पाऊल ...
ही गोष्ट करणं अमृता खानविलकरला चागलंच पडले महागात
धर्मा प्रोडक्शन्सच्या 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या‘डॅमेज’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दूनियेत पाऊल ठेवतेय. राजीमध्ये मुनिरा ह्या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता डॅमेज ह्या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे. सूत्रांनुसार, ह्या बिंधास्त, बेपरवाह लविनाच्या भूमिकेला न्याय देताना अमृताला धूम्रपान करावे लागते आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कधीही धूम्रपान न लावणारी अमृता भूमिकेची गरज म्हणून धूम्रपान करायला तयार तर झाली. पण तिला ते काही जमत नव्हतं. डॅमेज वेबसीरिजच्या युनिटकडून कळतं की, सिगरेट पकडण्यापासून ते एखाद्या व्यसनीमाणसाप्रमाणे सिगरेट ओढण्यासाठीचा सराव अमृताला चांगलाच महागात पडला. तिने ह्या शुटिंगच्या दरम्यान एके दिवशी 40 सिगरेट ओढल्या आणि त्यामुळेनंतर तब्बल दोन आठवडे तिच्या तोंडातून आवाज निघणेच कठीण झाले होते. अमृता ह्याविषयी सांगते, “मला धूम्रपानाच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी धूम्रपान असेल तर मी लगेच त्या व्यक्तिला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच धूम्रपान करणं भाग होतं. धूम्रपान करणे ही माझ्या भूमिकेचा अविभाज्य हिस्सा असल्याने मी तयार झाले खरी, पण मला धूम्रपान करणं जमेच ना.” अमृता पुढे सांगते, “शुटिंगदरम्यान दिग्दर्शक सारखा ओरडत होता, इनहेल कर.. पण काही ते इनहेल करून सिगरेटचा धूर व्यवस्थित सोडणं मला जमत नव्हतं. दिवसअखेरीला ते जमलं खरं. पण ह्या फंदात एका दिवसात मी 40 वेळा धूम्रपान केले. त्यामुळे दुस-या दिवसापासून माझा घसाच बसला. जवळ जवळ दोन आठवडे मला बोलता येत नव्हतं”