Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता सातवे आसमाँन पर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:46 IST

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या सातवे आसमाँन पर आहे. कारण बॉलिवूडचा अभिनेता आशिष विदयार्थीने तिचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक ...

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या सातवे आसमाँन पर आहे. कारण बॉलिवूडचा अभिनेता आशिष विदयार्थीने तिचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा '२४' या मालिकेचा एपिसोड प्रदर्शित झाला. या एपिसोडमध्ये अमृताने केलेल्या अभिनयाचे कौतुक आशिषने केले आहे. आशिषने टि्वट करुन अमृताच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तसेच त्याने अमृतासह '24'च्या संपूर्ण टीमचेदेखील कौतुक केले आहे. अमृता हे टि्वट पाहुन भारवून गेली आहे. तिने आशिषने केलेले टि्वटचा कोलाज करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. ''तुम्ही माझ्या अभिनयाचे केलेले कौतुक खरेच माझ्यासाठी सरप्राईज होते.'' आजच्या माझ्या दिवसाचे सार्थ झाले असल्याचे अमृताने म्हटले आहे. अमृताचा हा आनंद पाहता ती नक्कीच सातवे आसमाँपर दिसते आहे.