अमृताने स्वीकारले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 13:42 IST
अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या ...
अमृताने स्वीकारले आव्हान
अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता मैं अॅल्बर्ट अॅनस्टान बनना चाहता हूँ या तिच्या आगामी चित्रपटात ती एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी अमृता सांगते, "आपल्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारत आहे. या स्त्रीला शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी ती नेहमी प्रोत्साहन देते. तसेच नेहमीच त्याच्या पाठीशी उभी राहाते. मूक बधीर स्त्रीची भूमिका साकारणे सोपे नाहीये. मी अभिनय करताना माझ्या भावना डोळ्यांच्या मदतीने व्यक्त केल्या आहेत. या भूमिकेसाठी मला खूपच मेहनत घ्यावी लागली. माझ्यासाठी हे एक आव्हानच होते. पण हे आव्हान मी चांगल्यारितीने पेलले आहे असे मला वाटते."