Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय आणि निपुणची हवा गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:07 IST

सैराटच्या टिमसोबतचा 'कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण'चा चौथा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आणि काही वेळात व्हायरल पण झाला ना. या १५ मिनिटांमध्ये

सैराटच्या टिमसोबतचा 'कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण'चा चौथा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आणि काही वेळात व्हायरल पण झाला ना. या १५ मिनिटांमध्ये अमेय आणि निपुणची नागराज मंजुळे, रिंकू आणि आकाश, सुरज यांच्यासमोर जी हवा गुल झाली आहे ती पाहायला फार धमाल येते.

अमेय आणि निपुण हे दोघं नरसाळे आर्ची आणि आकाशला किती प्रश्न विचारतात आणि आर्ची-आकाश त्यांच्या प्रश्नांना कसे उडवून लावतात हे सगळं यामध्ये बघायला मिळणार आहे. अमेयच्या हट्टाखातर नागराज घेतील का अमेय-निपुणला दत्तक की प्रिन्स भाऊच्या दहशतीमुळे अमेय-निपुण तिथून काढता पाय घेतात?

अमेय,निपुण आणि सारंग साठे या तिघांनी मिळून सारं काही मांडलय या व्हिडीयोमध्ये. चला मग अमेयच्याच भाषेत सांगतो तुम्हांला की  लवकर पाहा, आवडून घ्या आणि वाटा.