Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय वाघ ते सायली संजीव! 'या' मराठी कलाकारांकडे आहेत मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:00 IST

Marathi celebrity: अमेय वाघने त्याच्या वाढदिवशी स्वत:ला मसिर्डीज कार गिफ्ट केली.

कलाविश्वातील सेलिब्रिटींचा चाहत्यांना कायमच हेवा वाटत असतो. त्यामुळे या कलाकारांच्या लक्झरी लाइफस्टाइलविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात. यामध्येच आज मराठी कलाविश्वातील सर्वात महागड्या गाड्या वापरणारे कलाकार कोणते ते पाहुयात.

अमेय वाघ -

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या अमेयकडे मर्सिडीज कार आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये अमेयने त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मर्सिडीझ कार खरेदी केली. या कारची बेसिक किंमत ४० लाख रुपये असून ऑन रोड प्राईज ही ४७ लाखांच्या जवळपास असल्याचं म्हटलं जातं .

मंदार जाधव-

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे मंदार जाधव. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये झळकलेल्या मंदारकडे मर्सिडीज कार आहे. मंदारनेदेखील २०२१मध्ये त्याची नवी कार खरेदी केली. त्याची किंमत ४७ लाख रुपये आहे.

स्वप्नील जोशी -

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याच्याकडेही आलिशान गाडी आहे. त्याने ‘जॅग्वार आय पेस’ ही लक्झरी कार खरेदी केली आहे. इन्टाग्रामवर या गाडीसोबतचे फोटो त्याने शेअर केले होते.

हार्दिक जोशी -

तुझ्यात जीव रंगला आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. दिवाळीमध्ये त्याने  महिंद्रा बलेरो ही आलिशान गाडी खरेदी केली.

सायली संजीव -

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिने तिच्या हक्काची कार खरेदी केली आहे. सायलीकडे baleno ही कार आहे.

अमोल नाईक -

'तुझ्यात जीव रंगला' याच मालिकेतील बरकत ही भूमिका साकारलेला अभिनेता अमोल नाईक याच्याकडेदेखील स्वत:ची कार आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याने नवीन गाडी खरेदी केल्याचं सांगितलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाअमेय वाघहार्दिक जोशीसायली संजीव