Join us

​अमरनाथ यात्रेकरूंना गश्मीर महाजनी वाहणार नृत्याद्वारे श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 16:14 IST

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर आणि पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता ...

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर आणि पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता गश्मीर महाजनी येत्या 21 जुलैला या यात्रेकरूंना आपल्या डान्स अॅकेडमीद्वारे श्रद्धांजली अर्पित करणार आहे.अभिनेता गश्मीर महाजनीची गेल्य़ा 17 वर्षांपासून पुण्यामध्ये स्वत:ची डान्स अॅकेडमी आहे. दरवर्षी या अॅकेडमीचे वार्षिक संमेलन होते. ज्यात अॅकेडमीचे विद्यार्थी परफॉर्म करतात. यंदा 21 जुलैला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वार्षिक संमेलन होणार आहे. या संमेलनात आपल्य़ा अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सद्वारे गश्मीर दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. गश्मीर याविषयी सांगतो, “अमरनाथ हल्ल्याविषयी ऐकल्यावर आणि वाचल्यावर मला प्रचंड दुःख वाटले. तेव्हापासून मी प्रचंड अस्वस्थ होतो. मी एक कलाकार आहे आणि मी माझ्या कलाकृतीतूनच आपल्या भावना व्यक्त करू शकतो. म्हणूनच मी माझ्या अॅकेडमीच्या वार्षिक संमेलनाला एक डान्स अॅक्टद्वारे या दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली वाहणार आहे आणि माझ्या भावनांना वाट करून देणार आहे.”  गश्मीर महाजनी हा एकमेव मराठी सेलिब्रिटी आहे, ज्याची स्वत:ची डान्स अॅकेडमी आहे. तो त्याच्या डान्स अॅकेडमीच्या विद्य़ार्थ्यांसाठी स्वत: कोरीओग्राफी करतो. त्याच्या अॅकेडमीच्या या वार्षिक संमेलनात भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारापासून ते कंटेम्पररी डान्स फॉर्मपर्यंत वेगवगळ्या प्रकारचे नृत्यप्रकार पाहायला मिळणार आहेत.गश्मीर महाजनी हा प्रसिद्ध अभिनेता रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. त्याने कॅरी ऑन मराठी, देऊळ बंद, कान्हा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Also Read : गश्मीर महाजनीच्या मुलाचा फोटो तुम्ही पाहिलात का?