Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अमर फोटो स्टुडियो’ मराठी नाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 10:05 IST

गेले एक-दोन दिवस सोशल मिडीयावर आपण जे काही कलाकारांचे जुने पासपोर्ट साइज फोटो बघतोय ना आणि प्रत्येक पोस्टच्या शेवटी ...

गेले एक-दोन दिवस सोशल मिडीयावर आपण जे काही कलाकारांचे जुने पासपोर्ट साइज फोटो बघतोय ना आणि प्रत्येक पोस्टच्या शेवटी #amarphotostudio हे हॅशटॅग आहे ना त्याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. अमर फोटो स्टुडियो हा नवीन फोटो स्टुडियो आहे का, मराठी चित्रपट वा नाटक आहे का असे बरेचशे प्रश्न आपल्या सर्वांना पडले होते. आता आम्ही तुम्हांला सांगतो नक्की हे काय आहे.          

अमर फोटो स्टुडियो हे मराठी नाटक आहे जे लवकरच रंगभूमीवर अवतरणार आहे.  कलाकारखाना प्रस्तुती आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले आहे आणि या नाटकाचे लिखान मनस्विनी यांनी केले आहे.

या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि सिध्देश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाच्या नावावरुन आणि या नाटकातील कलाकारांची ओळख पटल्यावर आता प्रेक्षकांमध्ये याविषयी जास्त उत्सुकता असेल.