Join us

'हॅरी पॉटर' चे दिग्दर्शक अलफॉन्सो क्युरॉन सोबत चैतन्यला काम करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 19:40 IST

‘कोर्ट’ या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याला हॉलिवूड फिल्ममेकर अलफॉन्सो क्युरॉन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्याची ‘रोलेक्स ...

‘कोर्ट’ या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याला हॉलिवूड फिल्ममेकर अलफॉन्सो क्युरॉन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्याची ‘रोलेक्स मेन्टॉंर अँड प्रोटेजी २०१६-१७’ मध्ये निवड करण्यात आली आहे. खुद्द अलफॉन्सो यांनी चैतन्यची निवड केली.‘रोलेक्स मेन्टॉंर अँड प्रोटेजी आर्ट्स इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमाअंतर्गत नवीन कलाकारांना अनुभवी कलाकारांचा सहवास व मार्गदर्शन मिळते. आॅस्कर विजेते फिल्ममेकर अलफॉन्सो क्युरॉन यांनी आतापर्यंत ‘ग्रेट एक्सपेकटेशन्स’, ‘चिलेंड्रन आॅफ मेन’, ‘ग्रॅव्हिटी’ आणि ‘हॅरी पॉटर सिनेमा: दि प्रिझनर आॅफ अझकाबान’ या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.चैतन्य ताम्हाणेचा ‘कोर्ट’ २०१५ साली प्रदर्शित झाला आणि भारताकडून ‘आॅस्कर’साठी ‘कोर्ट’ ची  निवड करण्यात आली. तेव्हापासून एका वेगळ्या विषयावर चैतन्य काम करत असल्याचे तो स्वत: म्हणाला होता.चैतन्यच्या माध्यमातूनू मराठी फिल्ममेकरच्या कामाची जगभरातील कलाकारांकडून प्रशंसा होते ही गोष्ट खरंच आनंददायक आणि अभिमानाची आहे.