मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार असे आहेत की जे आपल्याला पडद्यामागे कामे करतानाही दिसतात. आजचे कलाकार हे गायन, लेखन, दिग्दर्शन, तर काहीजण निर्मितीत देखील उतरले आहेत. आता हेच पाहा ना, अनेक वर्षे रंगभूमी गाजविलेल्या कलाकार डॉ. मीना नेरूरकर त्यांचा पहिलाच चित्रपट घेऊन येत आहेत. अ डॉट कॉम मॉम असे या चित्रपटाचे नाव आहे. मीना आपल्याला या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. परंतू त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे आणि चित्रपटातील गाणी सुद्धा लिहिली आहेत. अहो एवढेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्या देखील मीना नेरूरकरच आहेत. एकाच चित्रपटासाठी अनेक भूमिका पार पाडणाºया मीना ताईंना खरच आॅल राऊंडरच म्हणावे लागेल. याविषयी सीएनएक्सशी बोलताना त्या म्हणाल्या, या चित्रपटाचे मी खरतर दिग्दर्शनच करणार होते. चित्रपटासाठी निर्माते वेगळे होते. परंतू ऐनवेळी त्यांनी नकार दिल्याने मलाच माझी फिल्म विकत घ्यावी लागली. अन मी या चित्रपटाची निर्माती देखील झाले. अनेक वर्षांपासून मी अमेरिकेत नाटकांमध्ये कामे करित असल्याने एका वेळेस अनेक गोष्टी करायची मला सवय होती. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे किंवा कामाचे मला कधीच ओझे वाटले नाही.
आॅल राऊंडर डॉट कॉम मॉम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:14 IST