Join us

अलका कुबल यांच्या दोन्ही मुली सिनेइंडस्ट्रीत नाही तर या क्षेत्रात आहेत कार्यरत, दिसायला आहेत खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 16:06 IST

अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर मुलींचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री अलका कुबल यांनी विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव आहे कस्तुरी. या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर डॉटर्स डेच्या निमित्ताने दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी म्हटले की, हॅप्पी डॉटर्स डे. डॅडी आणि मला तुमच्या दोघींचा खूप आनंद वाटतो.

ईशानी वैमानिक आहे. तिच्यामध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचा निश्चय केला.

ईशानीने वैमानिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने शिक्षण घेत असताना खूप अभ्यास केला मेहनत घेतली आणि तिने घेतलेल्या मेहनतीचे फळही तिला चांगलेच भेटले. त्यानंतर तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसेन्स देखील भेटले आहे.

ईशानीचे दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्न झाले आहे. अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे.

टॅग्स :अलका कुबल