Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आलिया म्हणाली, ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 21:45 IST

चुलबुली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर  ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर  एकत्र आलेत .लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय ...

चुलबुली आलिया भट्ट आणि रणबीर कपूर  ‘लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर २०१७’च्या व्यासपीठावर  एकत्र आलेत .लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांना बोलते केले. यावेळी मी मुंबईची मराठी मुलगी असल्याचे आलिया म्हणाली. रणबीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी ११ वर्षांचे होते. रणबीर संजय लीला भन्साळींना अस्टिस्ट करत होता. त्यावेळी काही वाटले नाही. पण ‘सावरियां’मध्ये रणबीरला पाहिले अन् मी त्याच्यावर लट्टू झाले, असे आलिया म्हणाली. रणबीरची ‘बर्फी’मधली भूमिका बेस्ट होती, असेही तिने सांगितले.