Join us

अरूण गवळीच्या मुलीसोबत उद्या हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:22 IST

अरूण गवळीच्या मुलीसोबत उद्या हा मराठमोळा अभिनेता चढणार बोहल्यावर

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (8 मे रोजी) लग्नबेडीत अडकणार आहेत. लॉकडाऊनचे नियम पाळत हा विवाह पार पडणार आहे. खरेतर हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते.  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असणार आहेत.लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. योगिताला आज संध्याकाळी हळद लागणार आहे. अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ या चित्रपटात झळकला आहे. तो ‘ती फुलराणी’ या मालिकेतून घराघरात पोहचला आहे.अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला.

दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

टॅग्स :अरुण गवळी