Join us
Daily Top 2Weekly Top 5

Akash Thosar : ‘झुंड’नंतर मला जिमचा नाद लागला होता, पण..., आकाश ठोसरने फक्त नागराज अण्णांचं ऐकलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:00 IST

Akash Thosar : सैराटचा परश्या अर्थात आकाश ठोसर सध्या जाम चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. आकाशचा घर बंदूक बिरयानी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सैराटचा परश्या अर्थात आकाश ठोसर (Akash Thosar ) सध्या जाम चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. आकाशचा घर बंदूक बिरयानी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. गेल्या काही दिवसांपासून आकाशच्या या सिनेमानं लोकांची उत्सुकता ताणून धरली आहे.  हे घर, बंदूक आणि बिरयानी प्रकरण नेमकं काय आहे, यात नेमकी कोणती कथा पाहायला मिळणार आहे, असं अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.  तुम्ही या सिनेमातील आकाशचा लुक पाहिला असेल तर जाणवेल की, त्याचा लुक फारच हटके आणि वेगळा आहे. यासाठी आकाशला बरीच मेहनत घ्यावी लागली.न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत घर बंदूक बिरयानी या सिनेमातील हटके लुकबद्दल सांगितलं.

दोन वर्ष केसच कापले नाहीत...आकाश म्हणाला, "झुंड सिनेमानंतर मी केसांना कात्रीच लावली नाही. केसांना अजिबात हात लावायचा नाही. फिल्म शुट करताना आपण पाहू की काय हेअर स्टाइल करता येईल. केस वाढू देत, असं नागराज अण्णांनी सांगितल्यावर दोन वर्ष मी केस कापले नाहीत.  घर बंदूक बिरयानीच्या शुटींगच्या काही दिवस आधी  हेअर स्टाइल कशी करायची हे ठरलं. लांब केस चांगले दिसत असल्याचं ते म्हणाले.  

नंतर अण्णा म्हणाले...केस वाढवायला सुरूवात केली होती. मग नागराज अण्णा म्हणाले अशी बॉडी नको. झुंडनंतर मला जिमचा नाद लागला होता. मस्त मसल्स, सिक्स पॅक्स वगैरे केले होते.  पण अशी बॉडी नको. जरा स्लीम आणि फिट दिसला पाहिजेस, असं अण्णा म्हणाल्यावर मग अनेक दिवस शरीरावर काम करावं लागलं,असंही आकाशने सांगितलं. घर बंदूक बिरयानीसाठी  आम्ही सगळे बसून स्क्रिप्ट वाचायचो. पाठ करायचो. मग आण्णांसमोर जाऊन परफॉर्म करायचो. अशी सगळी मेहनत करून मग फिल्म शुट केली, अशी माहितीही त्याने दिली.

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळेमराठी अभिनेता