Join us

​बॉलिवूडच्या दुटप्पीपणावर अजिंक्यचे ताशेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 09:04 IST

देव घराण्याचे नाव मराठी सिनेमांमध्ये फार आदराने घेतले जाते. रमेश आणि सीमा देव, त्यांची मुले अजिंक्य व अभिनय देव ...

देव घराण्याचे नाव मराठी सिनेमांमध्ये फार आदराने घेतले जाते. रमेश आणि सीमा देव, त्यांची मुले अजिंक्य व अभिनय देव गेली अनेक वर्षे मराठी आणि हिंदी चित्रपटांत योगदान देत आहेत. मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधील सगळे बदल तर त्यांनी फार जवळून पाहिले. त्याविषयी बोलताना अजिक्य देव म्हणतो की, मराठी सिनेमा नेहमीच वास्तववादी राहिलेला आहे. मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींचे तर जगभरात कौतुक होते. मात्र हिंदी सिनेमाने त्यांना नेहमीच साईड रोल देऊन डावललेले आहे. विचारले तर ते म्हणतात की, मराठी कलाकारांचा अ‍ॅक्सेंट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण बॉलिवूडमध्ये असे खूप सारे विदेशी कलाकार आहेत ज्यांन अ‍ॅक्सेंट तर सोडा, नीट हिंदही बोलता येत नाही त्यांना लीड रोल दिला जातो. आता बॉलिवूडचा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय?अजिंक्यचा रोख कॅटरिना कैफकडे तर नाही ना?