Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याबद्दल काही लोकांचे कान भरले गेले..', अजिंक्य देव यांनी सांगितलं काम न मिळण्यामागचं कारण, म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:59 IST

लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये अजिंक्य देव यांनी करिअरसोबत खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

मराठी कलाविश्वातील रुबाबदार आणि हँडसम हंक म्हणून एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे अजिंक्य देव. आजही अजिंक्य देव यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अजिंक्य देव यांना कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. अजिंक्य देव हे दिवंगत अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे पुत्र. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. 

'माहेरची साडी', 'बाळा जो जो रे', 'कशासाठी प्रेमासाठी', 'वहिनीची माया' अशा सुपरहिट चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी नाव कमावलं. नुकतंच अजिंक्य देव यांनी 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधल्या. या मुलाखतीत त्यांनी मधल्या काळात ते नेमकं पडद्यावरुन का गायब होते. नक्की काय करतो होते याबाबतचा खुलासा केला आहे. 

'वासुदेव बळवंत फडके' सिनेमाच्या वेळी अजिंक्य देव मोठा गॅपनंतर स्क्रिनवर येतायेत असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याचं लोकमतच्या नो फिल्टर कार्यक्रमात अजिंक्य देव यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, खरंतर असं नव्हतं, मी आमच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामात बिझी होतो. मी खूप जास्त लोकांना जाऊन कधी भेटलो नाही. कदाचित माझा पीआर कमी पडला असेल. तसेच मराठी सिनेसृष्टी असेही झालं की हा ऐवढा मोठा आहे आपल्या बजेटमध्ये यांना कसा बसवायचं म्हणून लोक आली नाहीत. काही लोकांचं कान भरले गेले की, तो म्हणजे फारच उद्धट आहे, जे खोटं होतं. ती लोक ही आली नाहीत. जे आले त्यांना चांगला अनुभव आला. त्यातील काही लोकांचं चित्रपट चालले नाहीत, काही लोकांचे चित्रपट लागले नाहीत. त्यामुळे हे ऐकूण काही तरी विचित्र समीकरण झाले होते. माझे जे काही चित्रपट प्रदर्शित झाले ते लोकापर्यंत पोहोचण्याच्या आधीच निघून गेलं. चांगले असतानाही ते जास्त चालले नाहीत. प्रेक्षकांना तुम्ही डोळ्यासमोर दिसलात नाही की ते लगेच म्हणतात अरे बरेच दिवसात दिसलात नाही. आता पर्यंत मी जळसपास १४० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात मराठी, हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांचा समावेश आहे.     

टॅग्स :अजिंक्य देव