Join us

काजोलने क्लॅप वाजवून अजय देवगणच्या नव्या मराठी चित्रपटाचा केला प्रारंभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 21:20 IST

अभिनेता तथा निर्माता अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत बनविल्या जात असलेल्या दुसºया मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली ...

अभिनेता तथा निर्माता अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत बनविल्या जात असलेल्या दुसºया मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द अजय देवगण यानेच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. अजयने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आज आमच्या प्रॉडक्शनच्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ झाला आहे. सर्वांना शुभेच्छा.’ यावेळी अजयने मुहूर्त शॉटचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये अजयची पत्नी काजोल क्लॅपबोर्ड वाजविताना दिसत आहे. अजयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करणार आहेत.सतीश राजवाडे यांनी ‘वास्तव’सारख्या सुपरहिट चित्रपटात अभिनय केला आहे. त्याचबरोबर ‘मुंबई-पुणे मुंबई-२’, ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या मराठी चित्रपटांचा ते भाग राहिले आहेत. दरम्यान, या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नानांनी अजयबरोबर ‘अपहरण’, ‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अगोदर अजयच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत ‘विट्टी दांडू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या अजय त्याच्या आगामी ‘गोलमा अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, हा चित्रपट येत्या दिवाळीला रिलीज होणार आहे. चित्रपटात तो गोपालची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट ‘गोलमाल’ सिरीजचा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करीत असून, अजय व्यतिरिक्त तब्बू, परिणीती चोपडा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, तुषार कपूर आणि नील नितीन मुकेश यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.दुसरीकडे काजोलच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाल्यास तिने नुकतेच तामीळ चित्रपट ‘वी.आय.पी.२’ची शूटिंग पूर्ण केली आहे. याअगोदर ती १९९७ मध्ये एका तामीळ चित्रपटात बघावयास मिळाली होती. ‘वी.आय.पी.२’मध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. तर काजोल एका बिझनेस वुमेनच्या भूमिकेत दिसणार आहे.