अजय-अतुल ही मराठी कलाविश्वातील सुपरहिट जोडी. आजवर अनेक हिट गाणी त्यांनी दिली आहेत. केवळ मराठी सिनेसृष्टीच नव्हे तर बॉलिवूडलाही अजय-अतुलची भुरळ पडली. लग्न, पार्टी, इव्हेंट कुठेही असलो तरी अजय-अतुलचं गाणं वाजतचं. आणि सगळेच त्यावर ठेका धरतात. पण, आता चक्क अजय-अतुलनेच त्यांच्या गाण्यावर ठेका धरला आहे.
अजय-अतुलचं सैराटमधील झिंगाट गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. लग्नाच्या वरातीत हे गाणं हमखास वाजवलं जातं. झिंगाट गाण्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यामुळे लग्नाच्या वरातीत झिंगाट वाजलंच नाही असं होणारच नाही. एका लग्नाच्या वरातीतील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अजय-अतुल सैराटमधील झिंगाट गाण्यावर डान्स करत असल्याचं दिसत आहे. स्वत:च्याच गाण्यावर अजय-अतुल यांना लग्नाच्या वरातीत तुफान नाचताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचा हा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
सध्या अजय-अतुल रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाला याच जोडीने संगीत दिलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमातील गाणीही हिट ठरली आहे. या सिनेमातील 'राजा शिवाजी अँथम' साँगने चाहत्यांना वेड लावलं असून ते गाणं सोशल मीडियावरही ट्रेंडिंगमध्ये आहे.
Web Summary : Ajay-Atul, the popular musical duo, were seen dancing enthusiastically to their hit song 'Zingaat' at a wedding procession. A video of their dance has gone viral, amazing fans. They are currently in discussion for 'Raja Shivaji' movie.
Web Summary : लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल एक शादी के जुलूस में अपने हिट गाने 'झिंगाट' पर उत्साहपूर्वक नाचते हुए दिखाई दिए। उनके नृत्य का एक वीडियो वायरल हो गया है, जिसने प्रशंसकों को चकित कर दिया। वे फिलहाल 'राजा शिवाजी' फिल्म को लेकर चर्चा में हैं।