'वजनदार' सिनेमानंतर विधी कासलीवालचा पाणीप्रश्नावर भाष्य करणारा नवा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 15:39 IST
निर्माती - दिग्दर्शिका विधी कासलीवालने विविध पुरस्कार सोहळ्यात मोहोर उमटवल्यानंतर आता पुन्हा एकदा तिची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.चोहीबाजूंनी ...
'वजनदार' सिनेमानंतर विधी कासलीवालचा पाणीप्रश्नावर भाष्य करणारा नवा सिनेमा
निर्माती - दिग्दर्शिका विधी कासलीवालने विविध पुरस्कार सोहळ्यात मोहोर उमटवल्यानंतर आता पुन्हा एकदा तिची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.चोहीबाजूंनी वजनदार सिनेमाची निर्मिती केल्यापसून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. हाच कौतुकाचा वर्षाव होत असताना विधी कासलीवालने आपल्या नव्या सिनेमाची तयारीही सुरु केली आहे.रसिकांच्या काळजाला हात घालणारा विषय या सिनेमात मांडण्यात येणार आहे.या सिनेमाचं शीर्षक अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र महाराष्ट्रातील पाणी समस्येभोवती या सिनेमाचं कथानक असणार आहे. फिल्ममेकरवर त्याच्या आजूबाजूला घडणा-या गोष्टींचा प्रभाव पडत असतो त्यामुळे सिनेमाच्या कथेतून रसिकांचं मनोरंजन करण्यासोबत त्याचं प्रबोधन होणं महत्त्वाचं असतं. जेणेकरुन रसिक अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतो, बदल घडवू शकतो असं कथानक असणं महत्त्वाचं असतं असं कासलीवाल यांना वाटतं.'वजनदार' या सिनेमात महिलांच्या जास्त वजनाची समस्या मांडण्याचा प्रयत्न केल्याचं विधीने केला होता. आता आपल्या आगामी सिनेमातून भावनिक मुद्याला हात घालून रसिकांची मनं जिंकण्याचा इरादा असल्याचं तिने स्पष्ट केलंय. खरंतर विधीने आपल्या पहिल्याच सिनेमापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांना घेऊन 'सांगतो ऐका नावाचा' सिनेमाही तिने बनवला होता. या सिनेमालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'वजनदार' हा सिनेमा बनवला. या सिनेमालाही रसिकांनी डोक्यावर घेतलं. या सिनेमाचं रसिकांसोबत समीक्षकांनीही खूप कौतुक केलं.त्यामुळे विविध पुरस्कार सोहळ्यात नामांकनं मिळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला.