Join us

हृद्यांतर चित्रपटाचे चित्रिकरण संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 14:34 IST

गेली काही महिन्यांपासून हृद्यांतर या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटाला बराच बॉलिवुड टच आहे. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शन ...

गेली काही महिन्यांपासून हृद्यांतर या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटाला बराच बॉलिवुड टच आहे. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे तगडे फॅशन डिझायनर विक्रम फडनीस यांनी केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा मुहुर्तदेखील बॉलिवुडचा किंग खान शाहरूख खान याच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी कोरिओग्राफीदेखील फराह खान यांनी केल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच संपले आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीत एक तगडी जोडी पाहायला मिळणार आहे. मुक्ता आणि सुबोध पहिल्यांदाच एकत्रित झळकणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सोनाली खरे,मीना नाईक हे कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणमार आहेत.  विक्रम फडनीस प्रॉडक्शन, यंग बेरी एंटरट्नमेंट प्रस्तुत प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांचा हृद्यांतर हा एक भावनात्मक असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे.         मुक्ता आणि सुबोधने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या दोन्ही कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यत एक से एक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. मुक्ताने डबलसीट, पुणे मुंबई पुणे, जोगवा, गणवेश, हायवे, गोळा बेरीज, वायझेड असे अनेक चित्रपट दिले आहेत. तर सुबोधनेदेखील बालगंधर्व, फुगे, कटयार काळजात घुसली, भो भो, बालक पालक अशा अनेक सुपरहीट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे.