Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय वाघनंतर सखी गोखलेही पडली प्रेमात, त्या व्यक्तिसाठी 'टॅटू' गोंदवून केले प्रेम व्यक्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 12:53 IST

सध्या कॉलेजियन्सप्रमाणे सेलिब्रटींनाही एका गोष्टीने भारीच वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.ती गोष्ट म्हणेज हातावर किंवा मानेवर टॅटू गोंदवण्याचे प्रमाणे ...

सध्या कॉलेजियन्सप्रमाणे सेलिब्रटींनाही एका गोष्टीने भारीच वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.ती गोष्ट म्हणेज हातावर किंवा मानेवर टॅटू गोंदवण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातावर टॅटू गोंदवल्याचे पाहायला मिळते. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तिचे नाव असेल किंवा फुलांची नक्षी काम केलेले कलरफुल टॅटू असतील. मराठमोल्या सखी गोखलेलाही टॅटूने वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, सखीने फार फार तर एक किंवा दोन टॅटू  काढले असतील तर तर चक्क चार वेगवेगळ्या प्रकारांचे टॅटू तिने हातावर गोंदवून घेतले आहेत. जेव्हा जेव्हा सखीने हे टॅटू गोदवून घेतले तेव्हा तेव्हा तिने तिचे टॅटूचे फोटो तिच्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत.त्यात तिने टॅटू गोदवण्या मागची कारणही या फोटोच्या खाली स्पष्ट केली आहे.शेअर केलेल्या एका फोटोत फुलपाखराचा टॅटू तिच्या हातावर काढलेला आहे जो तिचा पहिला टॅटू आहे.तर दुसरा टॅटू तिने तिची आई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या वाढिदवसाच्या दिवशी आईला खास सरप्राईज गिफ्ट म्हणून काढला होता.सखीला अभिनयाव्यतिरिक्त फोटोग्राफीची आवड आहे.खासकरून तिला वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायला आवडते.त्यानुसार तिने तिसरा टॅटू पक्ष्यांचा नक्षीकाम असलेला तिच्या कानामागे गोदवून घेतला आहे.तर चौथ्या टॅटूमध्ये शाळेचा टॅटू काढल्याचे एका फोटोत पाहयला मिळत आहे. या फोटोंमध्ये दिसणारे तिचे टॅटू प्रेम पाहूनच तिला टॅटूचे भयंकर वेड असल्याचे पाहायला मिळत आहे.