Join us

'व्हॅलेंटाइन्स डे' निमित्ताने अदिती द्रविडने चाहत्यांना दिली ही अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:24 IST

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे.

ठळक मुद्देआदिती राधा बनून सुंदर नृत्य करताना दिसतेय

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्य करताना दिसतेय.

‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते, ‘’उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम डान्सर असल्याचा फायदा मला झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटा-तूट ह्यासंदर्भातल्या अनेक कथा आहेत. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला ह्या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. आणि त्यामूळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तमपध्दतीने साकारू शकले.”

आदिती पुढे सांगते, “ व्हॅलेंटाइन्स-डेला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली ही दैवी भावना ह्या गाण्याच्या शूटिंगवेळी अनुभवता आली. स्वत:ला विसरून दुस-यावर समर्पित भावनेने प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कुल लव्ह स्टोरी’ना मानते आणि ह्या व्हिडीओच्या शूटिंगच्या दरम्यान मला त्या समर्पित प्रेमातली उत्कटता अतरंगी स्पर्शून गेली. “

टायनी टॉकिज प्रस्तूत पियुष कुलकर्णी दिग्दर्शित हे मॅशअप सुवर्णा राठोडने गायले आहे, तर हे गाणे अभिनेत्री आदिती द्रविडवर चित्रीत झाले आहे.

टॅग्स :अदिती द्रविड