Join us

साडीत एखाद्या अप्सरे इतकीच सुंदर दिसते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 07:00 IST

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. अलीकडेच सोनालीने तिचा साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतेय.  सोशल मीडियावर फोटोला पसंती मिळत असून  फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.

सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी