Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा विंटर लूक व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:46 IST

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने विंटर लूकमधले फोटो शेअर करत  सगळ्यांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतीचे विंटर लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. या फोटोमध्ये संस्कृतीने फुल हँडचे स्वेटशर्ट परिधान केलं आहे.  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी केला आहे.

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

काही दिवसांपूर्वीच तिच्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

टॅग्स :संस्कृती बालगुडे