Join us

सई ताम्हणकरने खुल्लमखुल्ला दौलतरावांवर व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:20 IST

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली आहे. गेल्या काही दिवसांपासून सई रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. यावर तिने आता शिक्कामोर्तब केला आहे.

जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर(Sai Tamhankar) . आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. आज सईचा वाढदिवस आहे. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेटींसह चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायेत.  यातल्या एक पोस्टने यूजर्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

सईसाठी ही पोस्ट तिचे दौलतराव म्हणजे अनिश जोगने लिहिली आहे. अनिशने सईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक !! तू जग जिंकावे अशी माझी इच्छा आहे! असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. यावर लव्ह यू असा रिप्लाय अनिशला सईने दिला आहे. वाढदिवसाच्या दिवशी सईने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिश आणि सई  दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. या आधी सईनेही अनिशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर या चर्चा सुरु झाल्या होत्या. 

कोण आहे अनिश?सिनेनिर्माता अनिश जोग आहे. अनिश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय निर्माता असून त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'आणि काय हवं?', 'गर्लफ्रेंड', 'मुरांबा', 'वायझेड', 'डबल सीट', 'टाईम प्लीज' आणि 'धुरळा' या काही चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर