Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात स्वत:ला अशी फिट ठेवतेय प्रार्थना बेहरे, सेलिब्रेटी करतायेत कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 11:48 IST

प्रार्थनाच्या या फोटोवर सेलिब्रेटी कमेंट्सचा वर्षाव करतायेत.

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात आले आहेत. परिणामी सगळ्या सेलिब्रेटी घरीच आहेत. सध्या ते घरात आपल्या वर्कआऊटवर लक्ष केंद्रीत करतायेत. प्रार्थना बेहरेने तिच्या वर्कआऊट झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कोरोनाकाळात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सेलिब्रेटी सध्या फिटनेसवर भर देतायेत. प्रार्थनाच्या या फोटोवर सेलिब्रेटी कमेंट्सचा वर्षाव करतायेत.सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुव्रत जोशी आणि ह्रता दुर्गुळेने या फोटोवर कमेंट केल्या आहेत.  

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे