Join us

अभिनेत्री पूजा सावंतची भावी पतीसाठी रोमँटिक पोस्ट, म्हणाली - "तुझ्या येण्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:58 IST

अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) नुकतेच चाहत्यांना साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का बसला.

अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) नुकतेच चाहत्यांना साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का बसला. समुद्र किनाऱ्यावरील रोमँटिक फोटो शेअर करत तिने खुशखबर दिली होती. फोटो पाहिल्यानंतर तिचा होणारा नवरा कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यानंतर पूजाने त्याचा चेहरा दाखवत त्याची ओळख करुन दिली. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

पूजा सावंत हिने इंस्टाग्रामवर सिद्धेश चव्हाणसोबतचा फोटो शेअर केला आहे. तुझ्या येण्याने माझी वंडरलँड आणखीनच रंगीत झाली आहे. सिद्धेश चव्हाण. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.  

पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाण सोबतचे नाते नेहमीच गुपित ठेवले होते. तिच्या प्रेमाविषयी कोणालाच कानोकान खबरही लागली नाही. मात्र इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याविषयी माहित होते. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच तो परदेशात राहतो या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

वर्कफ्रंट...पूजा सावंत मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने क्षणभर विश्रांती चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने काम केले आहे. तसेच तिने जंगली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.  

टॅग्स :पूजा सावंत