Join us

कॅच मी इफ यू कॅन...! दिग्गज मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो, ओळखलंत का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:24 IST

Marathi Actress : मुंबईच्या रस्त्यावर रिक्षानं प्रवास करत असताना एखादी अशी तरूणी दिसली तर दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षात  बसलेली अशी ‘ती’ मोठी मराठी अभिनेत्रीही असू शकते.

पुण्यात, नागपुरात कोणत्याही रस्त्यावर जा,  स्कार्फनं चेहरा झाकलेल्या  मुली तुम्हाला हमखास दिसतील. मुंबईत मात्र असं दृश्य क्वचितच दिसतं. पण आता मुंबईच्या रस्त्यावर रिक्षानं प्रवास करत असताना एखादी अशी तरूणी दिसली तर दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षात  बसलेली अशी ‘ती’ मोठी मराठी अभिनेत्रीही असू शकते. होय, एका मराठी अभिनेत्रीने रिक्षातील तिचा स्कार्फ बांधलेला फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

‘कॅच मी इफ यू कॅन... कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे...,’ असा मजेशीर कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोत ही दिग्गज मराठी अभिनेत्री मुंबईत रिक्षामधून प्रवास करतेय. तिने चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला दिसतोय. डोळ्यांवर गॉगल आहे. साहजिकच तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. तुम्ही अद्यापही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मुक्ता बर्वे (Mukta Barve)आहे. मुक्ताने हा फोटो शेअर करताच, तिच्या या फोटोवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहे. ‘हाडाची पुणेकर’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. बाई कोरोना संपला आहे. काळजी नसावी खरंच, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.  मुक्ता बर्वेची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका नुकतीच संपली.  या मालिकेत मुक्ता अभिनेता उमेश कामतसोबत दिसली होती.  

टॅग्स :मुक्ता बर्वे