Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चितळेबाई आधी स्वतःची पितळे सांभाळा, नंतर तुमची अक्कल पाजळा", केतकीने पुन्हा केली वादग्रस्त पोस्ट, नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:15 IST

या आधी केतकी चितळेने सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीच्या या पोस्टने शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या केतकीला नेटीझन्स खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत.

दिवसेंदिवस केतकी चितळे वादाच्या भोव-यात अडकत आहे. सोशल मीडियावर वाग्रस्त पोस्ट करत ती भावना दुखावण्याचे काम करत आहे. सतत ता कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडत वादाला तोंड फोडत आहे. आता केतकी पुन्हा बरळली आहे. दारू पिण्याच्या मुद्द्यावरून टीका करणा-यांना त्यातून उत्तर दिलं आहे. या पोस्टमधून केतकीने आरोप आणि सत्य असे दोन फोटो शेअर केले असून एका बाजूला तिचा दारू पितानाचा व्हायरल होत असलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला दारूतून सरकारला मिळणारा कर याबाबतची बातमी असलेला फोटो शेअर केला आहे. दरम्यान, पोस्टनंतरही केतकी चितळे हिला आता आणखीनच ट्रोल केले जाऊ लागले आहे.

 

या आधी केतकी चितळेने सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीच्या या पोस्टने शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या केतकीला नेटीझन्स खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत. अशातच केतकी चितळेने पुन्हा एक पोस्ट लिहिली असून त्यात तिने शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

केतकीने म्हटले होते की, शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे ! तिला आलेले मेसेजचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला होता.केतकीला झाले तरी काय उगाच वादात राहून पब्लिसिटी मिळवण्याचा फंडा तिला महागात पडणार अशाच चर्चाही सुरू आहेत.

टॅग्स :केतकी चितळे