Join us

मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे दिसणार नव्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 17:48 IST

ऋता सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

दूर्वा , फुलपाखरु  सारख्या सुपरहिट मालिका , सिंगिंग स्टार सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि स्ट्रॉबेर्री शेक सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे सारखे एक दर्जेदार नाटक या मधून नावारुपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री ऋता दुर्गुळेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ऋता सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. 

ऋता सध्या पुण्यात असून तिचे शूटिंग करतेय. तिने आजवर दूर्वा, वैदेही , मन्या अशा वेगवेगळ्या भूमिका अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत आणि आता ती तिच्या चाहत्यांसाठी अदिती ही  एक नविन भूमिका घेऊन येणार आहे. स्ट्रॉबेर्री शेकचे दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर  यांच्या सोबत ओपनिंग फ्रेम मिडिया प्रोडक्शन द्वारे ती पुन्हा शूट करत आहे . इतकेच नव्हे तर स्ट्रॉबेर्री शेक ची बाकीची टीम सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे.

अदितीची भूमिका देण्याबद्दल तिने तिचे दिग्दर्शक शोनील  यल्लत्तीकर यांचे  सोशल मीडियावर आभार सुद्धा मांडले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर स्ट्रॉबेर्री शेकच्या टीम चे रियुनियनच या सेटवर झाले आहे. अदितीची भूमिका साकारण्यासाठी ती उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते. या प्रोजेक्टबद्दल अद्याप काही समजू शकले नाही. 

टॅग्स :ऋता दूर्गुळे