Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता उपेंद्र लिमये ‘प्रीतम’मध्ये दिसणार हटक्या भूमिकेत, जाणून त्यांच्या भूमिकेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 07:00 IST

अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे.

अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत पहायला मिळतायेत. हार्मोनियम सोबतचा फोटो बघून सध्या ते गायक संगीतकार झाले आहेत का? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. नेहमीच निरनिराळ्या भूमिका करण्याला प्राधान्य देणारे उपेंद्र अशीच एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहे. त्यासाठीच त्यांनी हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्यांचे हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये यांचा हटके अंदाज यात पहायला मिळतो आहे. येत्या १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 ‘पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील हे भन्नाट गाणं अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालं आहे. हे गाणं मस्त जमलं असून शब्द सुरांचा भन्नाट मिलाफ हे या गाण्याचं वेगळेपण म्हणता येईल. या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो. उपेंद्र यांचा हे गाणं प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.

उपेंद्र लिमये, यांच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी ‘प्रीतम’ मध्ये पहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

‘प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. ‘अॅड फिल्म मेकर’ सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

टॅग्स :उपेंद्र लिमये